मूळ गाव: किडेबिसरी, ता. सांगोला, जि. सोलापूर, महाराष्ट्र
शेती – माझं उत्तरदायित्व
शेती माझ्यासाठी केवळ व्यवसाय नाही – ती माझी आवड, माझं स्वप्न आणि जबाबदारी आहे.

आजची पिढी शेतीकडे नकारात्मक नजरेने पाहते – तोटा, कर्ज, नैराश्य... पण मी हे चित्र बदलायचं ठरवलं – "आता शेतीत तोटा नाही – फक्त नफा!"
ही केवळ एक कंपनी नाही,
ही एक चळवळ आहे – शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणाची.
इथे हजारो शेतकरी उत्पादन, प्रक्रिया, विक्री, दर निश्चिती, आणि ब्रँडिंग या प्रत्येक टप्प्यावर आमच्याशी जोडले गेले आहेत.
आम्ही फक्त बियाणं देत नाही,
आम्ही बाजार देतो, दिशा देतो, आणि आत्मविश्वासही!
शेतकरी मित्रांनो,
हे तुमचंच राज्य आहे – स्वप्नांचं, नफ्याचं आणि आत्मसन्मानाचं.
स्वागत आहे – माझ्या ‘शेतकरी राज्यात’!
Copyright © 2025 Gheradeagrofoods, All rights reserved.